Ad will apear here
Next
अवयवदानाच्या ऑनलाइन मोहिमेला प्रतिसाद


पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती मोहिमेअंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी अवयवदानाची ऑनलाइन मोहीम राबविण्यात आली व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. वैशाली भारंबे म्हणाल्या, ‘आजच्या परिस्थिती पाहिली, तर अवयव निकामी झाल्यामुळे पाच लाख लोक मरणाच्या दारात आहेत, त्यातील आठजणांचे जीव आपण एकटे वाचवू शकतो. दुर्देवाने अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अवयवदानाचा संकल्प सर्वांनी करावा. आपले अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात.’

अवयवदान करणे का गरजेचे आहे, कोणते अवयव आपण दान करू शकतो आणि केव्हा, त्याची प्रक्रिया काय आहे आदींबाबत डॉ. भारंबे यांनी माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ पुणेचे सदस्य गणेश जामगांवकर यांनी अवयवदान ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितली आणि उपस्थितांना अवयवदान ऑनलाइन प्रकियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

दिवसभरात २५० जणांनी अवयवदानाविषयी माहिती घेतली. अनेकांनी ऑनलाइन प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक, रुग्णालयीन कर्मचारी वर्ग यांच्याही सहभाग होता. अवयवदानाची ऑनलाइन प्रतिज्ञा प्रक्रिया प्रकिया मोबाइलद्वारे पूर्ण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अवयवदानासाठी भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन प्रतिज्ञा मोहिमेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा सहभाग होता. उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शन खाली ही मोहीम राबविण्यात आली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZSUBR
Similar Posts
पिंपरी येथे स्तन कर्करोगाविषयी परिषद उत्साहात पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडिओ डायग्नोसिस विभाग व ब्रेस्ट इमेजिंग सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालात स्तन कर्करोगाविषयी परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची उच्च रक्तदाब जागरूकता अभियानाअंतर्गत सर्वाधिक रुग्णांची अचूक रक्तदाब तपासणी केल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र मिलाल्यानिमित्त २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मेडिकल सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
‘तंदुरुस्त जीवनशैली विषयाचा अभ्यासक्रमात समावेश’ पुणे : ‘तंदुरुस्त जीवनशैली ही अत्यंत आवश्यक असून, या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाईल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी (ता. १५) पुण्यात केले.
‘‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन’ पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार आहे,’ अशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language